उमरखेड: २७ मे ( राजहिरा लाईव्ह न्युज )
संपादक : दिलीप मुनेश्वर
यवतमाळ, दि.26 (जिमाका) खरीप हंगामात कृषी यंत्राद्वारे शेत मशागतीची लगबग सुरु असून त्यासाठी शेतकऱ्यांना डिझेलची आवश्यकता लक्षात घेता जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या इंधन टाकीसह ४० लिटरच्या कॅनमध्ये डिझेल वितरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विकास मीना यांनी पेट्रोल पंप चालक व मालकांना दिले आहेत. जंक ठीक यवतमाळ जिल्ह्यात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑईल या तीनही कंपन्यांचा पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा आहे. परंतु समाज माध्यमांवर पेट्रोल-डिझेल विक्रीमध्ये तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक पेट्रोल पंपावर गर्दी करताना दिसून येत आहेत. या परिस्थितीच्या अनुषंगाने व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेचं सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पेट्रोल सारख्या ज्वलनशील पदार्थाच्या मुक्त विक्रीमुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शेतीच्या कामकाजासाठी डिझेलची आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे सद्यस्थितीचा विचार करता पेट्रोल-डिझेल विक्रीबाबत उपाययोजना करणे आवश्यक होते. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक व मालक यांनी शेतकऱ्यांच्या वाहनामध्ये पेट्रोल, डिझेल हे केवळ इंधनाच्या टाकीतच वितरित करावे, तसेच शेतकऱ्यांनी स्वतःचे वाहन पुर्णपणे भरुन त्यांचे वाहनासोबत (ट्रॅक्टर) त्यांचे वाहनाचे आरसी बुक सादर केल्यास त्याची पडताळणी करून त्यांना सोबतच ४० लिटरची एक कॅन डिझेल चा पुरवठा पेट्रोल पंप धारकानी करावा. कोणत्याही परिस्थितीत शेतीचे वाहन हजर नसताना पेट्रोल, डिझेल खुले उदा. कॅन, बाटली, डबा किंवा इतर कोणत्याही भांड्यात विक्री किंवा पुरवठा करण्यात येऊ नये.सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवा रात्रीचे वेळी कॅनमध्ये डिझेल, पेट्रोलची विक्री होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. पेट्रोल पंप परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवावी तसेच तसेच सीसीटीव्ही रिपोर्ट ४० दिवसापर्यंत जतन करुन तपासणी वेळी उपलब्ध करुन देण्यात यावा. तसेच संबंधित तालुक्यातील निरीक्षण अधिकारी यांनी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत आहे किंवा कसे याची शहानिशा करुन तसा अहवाल सादर करावा, असे आदेशित केले आहे.अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्राधान्य रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना प्राधान्याने इंधन पुरवठा करण्यात यावा.साठेबाजी, काळाबाजार रोखण्यासाठी पेट्रोल पंपांची तपासणी करा पेट्रोल व डिझेल यांची साठेबाजी किंवा काळाबाजार होणार नाही तसेच अतिरिक्त दराने पेट्रोल व डिझेलची विक्री होणार नाही याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी. तहसीलदार यांनी पथक गठीत करुन त्यांच्या तालुक्यातील पेट्रोल पंपांची तपासणी करून प्रत्येक आठवड्याला अहवाल सादर करावा. प्रत्येक पेट्रोल पंपाने दररोज आपल्या पंपावर उपलब्ध असलेला शिल्लक साठा, त्या दिवशी प्राप्त झालेला साठा व मागणी केलेला साठा याची माहिती दर्शनी भागात फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक राहील.इंधनाचा साठा करु नका, अफवांवर विश्वास ठेवू नका नागरिकांनी अनावश्यक गरजेपेक्षा जास्त इंधन भरून साठा करू नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असा फलक दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आदेशात दिल्या आहेत. या आदेशाचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी संबंधित पेट्रोल पंप मालक, चालक व व्यवस्थापक यांची राहणार आहे. हा आदेश तात्काळ प्रभावाने पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत लागू राहील, असे या आदेशात नमुद करण्यात आले आहे.000000वृत्त क्रमांक 416स्वाधार योजनेतील त्रृटी पूर्ण करण्यासाठी 30 मेपर्यंत मुदतवाढ यवतमाळ दि. 26 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी दि. 30 मेपर्यंत ऑनलाईन अर्जाताल त्रृटी पूर्ण करुन त्याची प्रत कार्यालयात सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. तसेच जे विद्यार्थी कागदपत्राची पुर्तता करणार नाही अशा विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात अर्ज करता येणार नाही व तो स्वाधार योजनेपासुन वंचित राहील, असे आयुक्तालय समाज कल्याण पुणे यांनी कळविले आहे. स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सर्व कागदपत्रासह अपलोड करुन 30 मेपर्यंत समाज कल्याण कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे परंतू त्याची प्रत अद्याप कार्यालयात सादर केली नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांनी विहीत कालावधीत अर्ज सादर न केल्यास व या योजनेपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची राहील. तसेच निर्धारीत मुदतीत त्रुटी पुर्तता न केल्यास विद्यार्थ्यांचा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगला मुन यांनी केले आहे.000000ौ






