उमरखेड : ३ एप्रिल ( राजहिरा लाईव न्यूज)
संपादक : दिलीप मुनेश्वर
उमरखेड तालुक्यातील मौजे बाळदी येथील एक वृद्ध व्यक्ती नामे उत्तम जेता राठोड वय ६५ वर्षे हे दिनांक २७ मार्च २०२६ रोजी सकाळी ९:०० पासून बेपत्ता आहेत
ते बँकेतून पैसे काढून आणतो असे सांगून ते निघून गेले असता, त्या दिवशी रात्रीपर्यंत घरी आले नसून जवळच्या सर्व नातेवाईकाला व आजूबाजूतील परिसरातील लोकांना सुद्धा विचारून शोध घेतला असता ते कुठेही आढळून आले नाहीत. त्यांचे वर्णन अंगात सडपातळ , वर्ण सावळा, उंची ५ फूट ५ इंच पोशाख पांढरी धोतर व पांढरी शर्ट , हातात काठी त्यांना दोन्ही डोळ्यांनी कमी दिसते… सदरील व्यक्ती कोणाला आढळल्यास किंवा दिसल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा – मो 8208351620







