दि. १२ जून (राजहिरा लाईव्ह न्युज) : दराटी प्रतिनिधी : प्रविण मुनेश्वर
मौजे दराटी येथे आज कोणत्याही गदारोळाशिवाय आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सदस्य आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. दराटी ग्रामपंचायतीमधून ‘शिवाजीनगर ग्रामपंचायत’ वेगळी झाल्यानंतर, आता दराटी येथे नवीन ९ सदस्यीय ग्रामपंचायत अस्तित्वात आली आहे. या नव्या रचनेनुसार जाहीर झालेल्या आरक्षणाचे गावकऱ्यांनी शांततेत स्वागत केले असून, उपस्थित अधिकाऱ्यांचे आभार मानले.ग्रामसभेचे प्राधिकृत अधिकारी विजय चौधरी (केंद्र प्रमुख, पं. स. उमरखेड), तलाठी सुनील वानखेडे, मुख्याध्यापक कोल्हे सर आणि डोंगरे सर यांच्या मुख्य उपस्थितीत ही शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. याप्रसंगी गावातील प्रमुख नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रभागनिहाय (वार्ड) अधिकृत आरक्षण पुढीलप्रमाणे:• प्रभाग (वार्ड) क्र. १ (एकूण ३ जागा)१) अनुसूचित जमाती – ST (महिला)२) अनुसूचित जमाती – ST (सर्वसाधारण)३) सर्वसाधारण (महिला)• प्रभाग (वार्ड) क्र. २ (एकूण ३ जागा)१) अनुसूचित जाती – SC (महिला)२) अनुसूचित जाती – SC (सर्वसाधारण)३) सर्वसाधारण• प्रभाग (वार्ड) क्र. ३ (एकूण ३ जागा)१) अनुसूचित जमाती – ST (महिला)२) सर्वसाधारण३) सर्वसाधारण (महिला)प्रतिक्रिया :नव्याने पुनर्रचित झालेल्या दराटी ग्रामपंचायतीची ही पहिलीच आरक्षण सोडत असल्याने संपूर्ण तालुक्याचे याकडे लक्ष लागले होते. कोणत्याही वादाविना आणि शांततेत ही प्रक्रिया पार पडल्याने प्रशासनाने देखील समाधान व्यक्त केले आहे. आरक्षण जाहीर होताच आता गावातील राजकीय घडामोडींना वेग आला असून इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.






