*राजहिरा लाईव्ह न्युज चॅनल*
*मुख्य संपादक: दिलीप मुनेश्वर
रविवार दिनांक 5 जून 2026 रोजी उमरखेड येथील नगरपरिषदेच्या हॉलमध्ये उमरखेड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले हनुमंतराव गायकवाड यांची बदली नंदुरबार येथे झाल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उमरखेड- महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे हे होते. या कार्यक्रमाला माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार उत्तमराव इंगळे, माजी आमदार नामदेव ससाने, जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा, शिवसेने नेते साहेबराव कांबळे, राजूभाऊ जयस्वाल, अँड.संतोष जैन उमरखेड, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ, महागावचे ठाणेदार सेवानंद वानखडे, पोफळीचे ठाणेदार निलेश शेंबडे, जेष्ठ पत्रकार विलासराव चव्हाण, रमण पाटील, जीन प्रेस अध्यक्ष शिवाजीराव माने, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित भाऊ वर्मा, नगरसेवक सुरेंद्रनाथ गोडगिरवार, रमेशराव चव्हाण व अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते. आपल्या कार्यक्रमात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल सर्वांनी त्यांचे विशेष कौतुक केले. त्यांच्या कार्यकाळात हणमंतराव गायकवाड यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि सण उत्सवाच्या काळात राबवलेली चौक, पोलीस बंदोबस्त व्यवस्था याबद्दल मान्यवरांनी त्यांच्या कार्याची मुक्त कंठाने कौतुक केले. केवळ पोलीस प्रशासनातच आणि जनता यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण केले होते. याप्रसंगी बोलताना हनुमंतराव गायकवाड म्हणाले पोलीस सेवा करताना जनतेचे सहकार्य हीच सर्वात मोठी शिदोरी असते. उमरखेड मध्ये काम करताना मिळालेले प्रेम आणि सहकार्याची साथ ही माझ्या आयुष्यातली मोठी मिळकत आहे. बदली ही प्रशासकीय प्रक्रिया असली तरी उमरखेडचे नाव व माझ्या वर्दीचा सन्मान कमी होऊ देणार नाही इथल्या आठवणी कायम मनात राहतील कार्यक्रमाच्या शेवटी त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सर्व पोलीस अधिकारी अमलदार व उमरखेड उपविभागातील सर्व पोलीस कर्मचारी आणि उपस्थित त्यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाची प्रास्ताविक पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी केले व सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ता गजानन शिंदे यांनी केले






