उमरखेड : राजहिरा लाईव्ह न्युज ( संपादक: दिलीप मुनेश्वर)
उमरखेड तालुक्यातील चालगणी येथील शेतकरी ऊसाला पाणी देत असताना व खत टाकताना गेले असता शेतकरी श्री दत्तराव भगवानराव शिंदे हे दिनांक 24/03/2016 रोजी सकाळी 10:30 वाजता रानडुकराच्या हल्ल्यात गंभीरित्या जखमी झाले असता त्यांना तात्काळ शासकीय उपजिल्हा रुग्णालय उमरखेड येथे भरती केले होते .परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक होती त्यामुळे , त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे रेफर करण्यात आले..सदरिल शेतकरी यांना वनविभागाच्या वतीने तात्काळ योग्य ती मदत करावी अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे







