उमरखेड (22 नोव्हेंबर) राजहिरा लाईव्ह न्युज
संपादक : दिलीप मुनेश्वर
उमरखेड नगरपरिषद निवडणूक 2025 च्या भाजपच्या प्रचाराचा ढोल ताशात भव्य शुभारंभ करण्यात आला. यामध्ये शहरातील सर्व समाजातील महापुरुषांना हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यामध्ये भाजपने भव्यशक्ती प्रदर्शन केले व यामध्ये सर्व आजी – माजी आमदार उपस्थित होते .तसेच सर्व भावी नगरसेवक व उमेदवार यामध्ये सामील झाले होते.. यामध्ये सर्व जनतेशी संवाद साधून आम्हाला साथ द्या असे आवाहन करण्यात आले . ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरत आहे. प्रत्येक उमेदवार हा आपल्या जवळचा वाटतो आहे या निवडणुकीमध्ये कोणाचा विजय होईल हे नक्की सांगता येत नाही. परंतु निवडणूक दिनांक जसा जसा जवळ येत आहे तशी प्रत्येक उमेदवाराची धाकधूक वाढलेली आहे आणि जनता कोणाच्या पारड्यात सत्ता देईल हे आता तरी सांगत येत नाही. उमरखेड तालुका व शहरामध्ये भाजपचे कार्यकर्ते व बूथ प्रमुख शक्ती प्रमुख इत्यादींनी आपापल्या पद्धतीने मतदारांना संपर्क करत आहेत..त्यामुळे सध्या तरी भाजप आघाडीवर दिसत आहे परंतु येणाऱ्या काळातच कळेल की कोण बाजी मारेल, तोपर्यंत सर्व कार्यरते आपापल्या पद्धतीने प्रचार करण्यात मग्न आहेत नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या नीधीताई नितीन भुतुडा ह्या उभे आहेत… साहजिकच नितीन भाऊंचा जनसंपर्क तगडा आहे . सत्ताधारी पक्ष असल्यामुळे व विद्यमान नगराध्यक्ष सुद्धा भाजपचाच असल्यामुळे भाजपचा विजय होईल असे दिसत आहे परंतु शेवटी मतदार राजा कोणाला सत्ता देईल हे आपणाला निकालानंतरच कळेल..







