उमरखेड ( दि 27 डिसेंबर) : राजहिरा लाईव्ह न्युज
संपादक : दिलीप मुनेश्वर
उमरखेड तालुक्यातील कृष्णापुर कोपरा (खुर्द) या ठिकाणी सप्टेंबर 2024 मध्ये एक हेक्टर जमिनीमध्ये बिहार पॅटर्न अंतर्गत 1600 बदाम, लिंब, मोहगण अशोका,जांभुळणी, सिताफळ व अनेक प्रकारचे या ठिकाणी झाडे लावण्यात आलेली आहेत. या झाडांची देखरेख सुद्धा आम्ही करीत असतो असे सामाजिक कार्यकर्ते शंकर मारोती निळकंठे, यांनी म्हटले आहे. या कामाचे मस्टर काढण्याकरिता गेले असता त्या ठिकाणी कोपरा येथील रोजगार सेवक यांनी अडचण आणली आहे. आता उन्हाळ्याचे दिवस जवळ आलेले आहेत. या कामाची बिल निघत नसल्यामुळे मजूर लावायचे कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तरी वरिष्ठ अधिकारी यांनी या कामाची पाहणी करून या कामाचे त्वरित बिल काढावे असे निळकंठे यांनी म्हटले आहे. त्यांचे सोबत गावातील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम अवधूत शिरगिरे, विजय लक्ष्मण रणमले हे होते. तर पाहूया सामाजिक कार्यकर्ते निळकंठे यांची प्रतिक्रिया







