उमरखेड ( 27 डिसेंबर) : राजहिरा लाईव्ह न्युज
संपादक : दिलीप मुनेश्वर
उमरखेड तालुक्यातील विडुळ ते देवसरी रोडवर ऊसाची वाहतूक चालू असताना चालगणी गावाजवळ दोन उसाच्या ट्रॉली पलटी झाल्या आहे. यामध्ये एक साईडला पूर्णत: ऊस रोडच्या खाली गेलेला आहे. यामुळे तेथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या घटनेला कारणीभूत तेथील बांधकाम ठेकेदार असून त्यांनी या ट्रॅक्टर मालकाला व शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे…सदरील रोडचे ठेकेदार यांनी तात्काळ दखल घ्यावी व चालू असलेले काम लवकरात लवकर करण्यात यावे… अशी मागणी सामान्य नागरिक करत आहेत







