उमरखेड , 7 डिसेंबर ( राजहिरा लाईव्ह न्युज)*
*संपादक : दिलीप मुनेश्वर , उमरखेड )*
उमरखेड पोलीस स्टेशन येथे फिर्यादी वरून कलम 109(1),189(2), 191(2), 191(3),190 या गुन्ह्यासह कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम सह कलम 4,25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता , गुन्हा दाखल झाल्यापासून सदर आरोपी हा फरार होता, सदर गुन्ह्यातील नऊ आरोपी यांना आतापर्यंत अटक केली आहे.
माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांचे मार्गदर्शनाखाली डिक्टेशन ब्रांचचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे व डी बी टीम यांनी गोपनीय बातमीदारासमार्फत माहिती काढून तसेच सायबर सेल यवतमाळ यांच्या मदतीने सदर गुन्ह्यातील गुन्हा घडल्यापासून फरार झालेला आरोपी नामे आकाश रवीप्रसाद दीक्षित वय 24 वर्षे रा.शिवाजी वार्ड उमरखेड, तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ यास दिनांक 7- 12 -2025 रोजी सायंकाळी त्याच्या शेतातून गोपनीय माहिती मिळालेल्या ठिकाणी जाऊन पोलिस कौशल्याचा वापर करून अतिशय शिताफीने त्याचा पाठलाग करून ताब्यात घेऊन सदर गुन्हात अटक केली आहे. सदर कारवाई यवतमाळ पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता साहेब, माननीय अपर अधिक्षक श्री अशोक थोरात साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमान गायकवाड साहेब, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ साहेब पोलीस, पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर सायबर सेल यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली DBप्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे ASI मधुकर पवार , पोलीस शिपाई संघशील टेंभरे, गिरजप्पा मुसळे , अमित पसले,किसन राठोड साहेब सायबर सेल यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पडली.







