उमरखेड , दि. 10 जाने : (राजहिरा लाईव्ह न्युज चॅनल )
संपादक : दिलीप मुनेश्वर
शैक्षणिक सत्र 2025-26 मधील सर्व प्रवेशित मागासवर्गीय, अनु. जाती, विजाभज, एसईबीसी, इमाव, विमाप्र राखीव प्रवर्गातील ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थ्यांना आपले जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव समितीकडे दि.31 डिसेंबर पर्यंत सादर करण्यासाठी मुदत होती, परंतु विद्यार्थ्यांना भविष्यात तांत्रिक पदवी प्रवेशाकरीता अडचणी येऊ नये म्हणून समितीमार्फत दि. 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तरी सर्व इतत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थ्यांनी 31 जानेवारीपूर्वी आपले जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव समिती कार्यालयात सादर करावे, असे आवाहन समितीमार्फत करण्यात आले आहे.







