उमरखेड : 10 जानेवारी (राजहिरा लाईव्ह न्युज)
बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुरली गावाजवळील मुरली बंधाऱ्याच्या परिसरात अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला. पैनगंगा नदीवरील बंधाऱ्याजवळ फारित( पोत्यात) दोरीने घट्ट बांधलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. आज सकाळी स्थानिक नागरिकांनी दुर्गंधी आल्याने ही घटना उघडकीस आली. संशयास्पपद पोते दिसताच नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर ही घटना उघडकीस आली असता अंदाजे 30 ते 40 वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह काही दिवसापूर्वीचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेह फारित गुंडाळला व काही खुणा आढळल्याने हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा संशय आहे. तीच माझी ओळख अद्यापटली नसून तो अज्ञात आहे. पोलिसाकडून परिसरातील बेपत्ता व्यक्तीच्या तक्रारी तपासल्या जात असून बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांची चौकशी सुरू आहे







