१७ जानेवारी ( राजहिरा लाईव्ह न्युज ) :
संपादक : दिलीप मुनेश्वर
उमरखेड शहर नगरपरिषद उपाध्यक्षपदी जुबेर कुरेशी यांची निवड करण्यात आली , तसेच स्वीकृत सदस्य म्हणून जनशक्ती पॅनलचे गोपाल भाऊ अग्रवाल व बाळासाहेब नाईक यांची , तर भाजप कडून विजय गुजरे सर यांची निवड करण्यात आली.नगरपालिकेत जनशक्ती पॅनल कडून तेजस्वी जैन या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या , तर 26 पैकी तब्बल 18 नगरसेवक हे जनशक्ती पॅनलचे निवडून आले आहेत. तसेच भाजपाचे 9 नगरसेवक निवडून आलेले आहेत. असे संख्याबळ असताना 2 स्वीकृत सदस्य हे जनशक्ती पॅनल कडून जाणार होते तर , 1 स्वीकृत सदस्य भाजपाकडून जाणार होते.
आज झालेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जनशक्ती पॅनल कडून जुबेर कुरेशी यांनी, तर भाजपकडून अमोल तिवरंगकर यांनी उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता त्यामध्ये 18 विरुद्ध 9 मताच्या फरकाने जुबेर कुरेशी हे उपाध्यक्षपदी विराजमान झाले. यावेळी स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये गोपाल भाऊ अग्रवाल, बाळासाहेब नाईक व विजय गुजरे सर यांची निवड करण्यात आली आहे. पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष तेजश्री जैन व मुख्याधिकारी अजय कुरवाडे हे उपस्थित होते.







