*दि 18 फेब्रु 2026 ( राजहिरा लाईव्ह न्युज उमरखेड )*
*संपादक : दिलीप मुनेश्वर*
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नागपूर रूपाला. पं.स. उमरखेड. येथे दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष :श्री सुनील खोलगडे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हे होते. प्रमुख पाहुणे : श्रीमती सुलावतीबाई डुकरे (सरपंच नागापूर रूपाला) , श्री सदानंद तोडासे ( पोलीस पाटील) , श्री मोहसीन भाई पठाण (सामाजिक कार्यकर्ते) ,श्रीमती संध्याताई तावडे ,श्री ज्ञानेश्वर रणखांब, श्रीमती अरुणाताई पतंगे श्री अरविंद जाधव सर ( माजी उच्च श्रेणी मुख्याध्यापक) , श्री प्रशांत आयचीत सर (उच्चश्रेणी मुख्याध्यापक) , श्री माधव येणकर सर (माजी उच्च श्रेणी मुख्याध्यापक) , श्री प्राध्यापक ढाके सर, श्री दिलीप मुनेश्वर ( पत्रकार) , उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मुस्ताक सर व सर्व उर्दू शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, श्रीमती नगारे मॅडम, श्री माधव केंद्रे सर , श्री आबासाहेब जवरे सर, सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य ,सर्व ग्रामपंचायत सदस्य ,समस्त गावकरी मंडळी सर्व पालक वर्ग हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री पंजाब रणवीर सर, श्रीमती चिंतावार मॅडम, श्री फड सर, श्रीमती दराडे मॅडम ,श्रीमती शिंदे मॅडम यांनी प्रयत्न करून कार्यक्रम यशस्वी पार पाडला. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांनी मान्यवरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले .कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना सर्व मान्यवरांनी बक्षीस देऊन त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. बाल कलाविष्कार 2026 या सांस्कृतिक कार्यक्रमाला गावातील सर्व नागरिक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते 💐💐🙏







