उमरखेड, दि 27 फेब्रुवारी – ( राजहिरा लाईव्ह न्युज)
संपादक : दिलीप मुनेश्वर
आज विधानभवनात पुरवणी मागणीवरील चर्चेदरम्यान उमरखेड – महागाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री किसनरावजी वानखेडे साहेब यांनी मतदारसंघातील उपजिल्हा रुग्णालय, उमरखेड व ग्रामीण रुग्णालय महागाव येथील रिक्त असलेली वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची पदे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रिक्त पदभरती याबाबतचा महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला.
सदर उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालय,महागाव येथील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा प्रभावीपणे उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होत असून, विशेषतः बंदी भागातील नागरिकांना मूलभूत आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे, ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली.
उक्त परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून उपजिल्हा रुग्णालय, उमरखेड व ग्रामीण रुग्णालय महागाव तसेच संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे केली.
मतदारसंघातील नागरिकांना सक्षम व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी शासनाने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी आमदार श्री किसनरावजी वानखेडे साहेब यांनी केली.






